संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शहरांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच समावेश आहे.

  मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. मात्र, काही ठिकाणी पहाटे थंडी तर दुपारी उकाडा जाणवत असल्यामुळे नागरिक हैरान झाले आहेत. मात्र, आता राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज (Maharashtra Rain) वर्तवण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

  राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता

  राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शहरांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच समावेश आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

  शेतकऱ्यांचं वाढलं टेन्शन

  सध्या राज्यात रब्बी पिकांचा हंगाम असल्याने पावसाच्या शक्यतेनं शेतकऱ्यांच काहीस टेन्शन वाढलं आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान खरीप पिकांना योग्य वाढीसाठी भरपूर पाणी आणि उबदार हवामान मिळाल्यानंतर हंगामाच्या शेवटी त्यांची कापणी करण्यात येते त्यामुळे अशा वेळी पावसाच आगमन झाल्यास शेतकऱ्यांच नुकसान होऊ शकतं.

  केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज

  महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.