चोरट्या महिलेने लंपास केले साडेसहा लाखांचे दागिने; खासगी रुग्णालयातील घटना

    यवतमाळ : खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सहा लाख रुपये किमतीचे दागिने एका महिलेने हातचलाखीने लंपास केले. डॉ. बाहेती यांच्या रुग्णालयातील चोरीची ही घटना घडली आहे.

    रजनी विठोबा तेलरांधे, असे फिर्यादी महिलेचे नाव असून, त्या मारेगाव येथील रहिवासी आहे. शिक्षिका असलेल्या महिलेच्या घरी यापूर्वीदेखील चोरीची घटना घडली होती. त्यामुळे चोरी होण्याच्या भीतीने त्यांनी दागीने सोबतच आणले होते. पर्स हलकी लागल्याने महिलेने दागिने तपासले असता, चोरीची घटना लक्षात आली.

    याप्रकरणी अवधूतवाडी पोलिय ठाणे रजनी तेलरांधे यांनी गाठले. मात्र, घटना शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात असून, पोलिस चोरट्या महिलेचा शोध घेत आहे.