
नागपूर (Nagpur) : गुन्हेशाखेच्या युनिट तीनने यशोधरानगरमधील गोदामावर छापा टाकून १३ लाख रुपये किमतीची सुपारी जप्त केली. ही सुपारी सडकी आहे. रासायनिक प्रक्रिया करून ती बाजारात विक्री करण्यात येणार होती.
यशोधरानगरमधील अनसूयानगर परिसरातील अस्लम यांच्या गोदामात सुपारीचा साठा असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांना मिळाली. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे निरीक्षक प्रदीप रायण्णावार व त्यांच्या पथकाने छापा टाकला. अस्लम यांना सुपारी खरेदी-विक्रीचे दस्तऐवज मागितले. त्यांच्याकडे दस्तऐवज नसल्याने पोलिसांनी सुपारी जप्त केली. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.