16 कोटींच्या ड्रग्जसह तिघांना अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई क्राइम ब्रँच युनिट 1 ने 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा तस्करांना अटक केली आहे.

    मुंबई : मुंबई क्राइम ब्रँच युनिट 1 ने 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा तस्करांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या सर्वांना अटक केली आहे.

    मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 3 जण ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर पूर्व माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले.

    त्यांच्या झडतीत 16 किलो 100 ग्रॅम मेथाक्‍लोन सापडले, ज्याची किंमत 16 कोटी दहा लाख रुपये आहे. पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.