बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान संपन्न; शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

आमदार सुनिल शेळके व बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने मावळ तालुक्यातील तीनशे दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना भाकड जनावरांसाठी वरदान असलेले 'रज्जो' औषधाचे मोफत वाटप करण्यात आले

    वडगाव मावळ : आमदार सुनिल शेळके व बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने मावळ तालुक्यातील तीनशे दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना भाकड जनावरांसाठी वरदान असलेले ‘रज्जो’ औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.

    बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीमार्फत तालुक्यात ‘गो से गोमाता’ अभियान राबविण्यात आले होते.या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात मावळातील १२०० भाकड जनावरे दुभती होणार आहेत.जानेवारी महिन्यात भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी आमदार सुनिल शेळके यांची भेट घेऊन मावळातील शेती,रोजगार अशा विविध क्षेत्रासाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले होते.त्या अनुषंगाने आमदार सुनिल शेळके यांच्या सहकार्यातून बीव्हीजी ग्रुपने पहिले पाऊल टाकले आहे.

    यावेळी आमदार शेळके म्हणाले, “बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने आपल्या तालुक्यात सेंद्रिय इंद्रायणी भात निर्मितीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पाद्वारे भात उत्पादक शेतकऱ्यांना बीव्हीजीची सेंद्रिय खते,औषधे देण्यात येणार आहेत.जगभरात सेंद्रिय शेतमाल निर्मितीची चळवळ शेतकऱ्यांच्या साथीने उभारली जात आहे आणि या चळवळीची सुरुवात आजच्या अभियानाने झाली आहे.बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.”
    या कार्यक्रमाचे स्वागत अरुण बारगजे यांनी तर आभार रवि घाटे यांनी केले.