अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध, जेलचे अधिकारीही चळचाळा कापतात, गडकरींना धमकी देणारा हा ‘पुजारी’ आहे तरी कोण?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) नागपूरच्या (Nagpur) कार्यालयात (Office) १०० कोटींची खडणी मागण्यात आली, इतकंच नाही तर खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. एकदा नव्हे तीन वेळा असे फोन करण्यात आले. या धमकी प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा खाडकन जाग्या झाल्या.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) नागपूरच्या (Nagpur) कार्यालयात (Office) १०० कोटींची खडणी मागण्यात आली, इतकंच नाही तर खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. एकदा नव्हे तीन वेळा असे फोन करण्यात आले. या धमकी प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा खाडकन जाग्या झाल्या. कर्नाटक राज्यातील बेळगावातून हा धमकीचा फोन आल्याचं तपासात समोर आलं. चौकशीत हा जेलचा नंबर असल्याचं कळालं. कर्नाटक पोलिसांनी तातडीनं हिंडालगा जेलमध्ये शोधाशोध केली. अखेरीस धमकी देणारा जेलमधील कैदी असल्याचं निष्पन्न झालं. जयेश पुजारी असं या आरोपीचं नाव. जयेश पुजारी स्वताला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा दावा करतोय. आता या नव्या गंगस्टरच्या तपासासाठी मुंबई पोलीसही बेळगावात दाखल झालेत.

    कोण आहे हा नवा पुजारी?

    स्वताला दाऊदचा गॅंगस्टर म्हणवून घेणाऱ्या या कैद्याचं नाव आहे जयेश पुजारी. काही दिवसांपूर्वी हत्याच्या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुजारीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्याकडून एक डायरी जप्त करण्यात आलीय. त्यात अनेक महत्त्वाचे नंबर पोलिसांना सापडलेत.

    आई आणि मुलाच्या हत्ये प्रकरणात फाशी

    दक्षिण कर्नाटकात राहणारा जयेश हा दुहेरी हत्याकांडातील दोषी आहे. जयेशचा चुलत भाऊ लोहित याची पत्नी सौम्या आणि तीन वर्षांचा लहानगा जिष्णू यांची त्यानं २ ऑगस्ट २००८ साली हत्या केली होती. शिराडी गावात त्यांच्या राहत्या घरी या हत्या केल्या. त्यानंतर सौम्याचे दागिने घेऊन जयेशनं पळ काढला होता.

    पोलिसांनी पकडल्यानंतर फाशीची शिक्षा

    २०१२ सालापर्यंत जयेश बेपत्ता होता. त्यानंतर त्याला केरळ पोलिसांनी पकडलं. खटल्याच्या सुनावणीवेळीही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला पुन्हा अटक करण्यात आली. सत्र न्यायालयानं त्याला २०१६ साली फाशीची शिक्षा सुनावली. जयेशनं आत्तापर्यंत अनेकदा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. जयेशचे अंडजरवर्ल्ड आणि महाराष्ट्रातही संपर्क असल्याचं पोलिसांचं म्हणणंय.

    जेल अधिकाऱ्यांनाही देतो धमक्या

    जेलमध्ये जयेश पुजारीचा चांगलाच दबदबा आहे. तो जेलच्या अधिकाऱ्यांनी धमक्या देतो, त्यांना घाबरवण्याचे प्रकार करत असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी तो अनेकदा त्याच्या सहकाऱ्यांसह जेलच्या आवारातूनच मोठ्या व्यक्तींना फोन करुन त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची माहितीही समोर आलीय. दाऊदच्या टोळीशी संबंध असल्याचंही तो राजरोसपणे सांगत फिरतो. त्याच्या या कृत्यामुळं त्याला वेगळ्या बराकती ठेवण्यात आलंय. तसचं जेल परिसरात आता मोबाईल जॅमर बसवण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.