टायगर 3 ने बॅाक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, जवानसह गदर 2 ला मागे टाकत केली ही कामगिरी!

  अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) यांची मुख्य भुमिका असलेल्या टायगर 3 (Tiger 3) दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रेक्षक आणि समिक्षांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी 44 कोटींची कमाई केली तर, आता रविवारी म्हणजे टायगर 3 नं  दुसऱ्या दिवशी (Tiger 3 box office collection day 2) किती कमाई केली जाणून घ्या.

  टायगर 3  रविवारी रिलीज झाला. अनेक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला होता. नाशिकच्या मालेगावात काही उत्साही चाहत्यांनी तर चित्रपटगृहात फटाके लावले. यावरुन चित्रपटाबद्दल असलेली क्रेझ दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशीच्या आकड्यांबद्दल बोलायचं झालं तर  Sacnik च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी भारतात 57.50 कोटींची कमाई केली आहे. या कलेक्शनमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांच्या बॉक्स ऑफिसचा समावेश आहे. पहिल्या दिवशी 45.5 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 57.50 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने 2 दिवसांत 102 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शननुसार टायगर 3 दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

  जवान-गदर 2 ला टाकलं मागे

  पठाणने दुसऱ्या दिवशी 70.50 कोटींची कमाई केली होती. यानंतर टायगर 3 57.50 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे. जवानाने दुसऱ्या दिवशी 53 कोटींची कमाई केली होती. गदर 2 बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने 43.8 कोटींची कमाई केली होती, तर टायगर 3 या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत दुसऱ्या स्थानावर आहे.

  दुसऱ्या दिवशी अॅडव्हान्स बुकिंग किती होती?

  अॅडव्हान्स बुकिंग रिपोर्टनुसार टायगर 3 तिसऱ्या क्रमांकावर होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची आगाऊ बुकिंग 17.48 कोटी रुपये होती. यापूर्वी, जवानाच्या दुसऱ्या दिवसाची आगाऊ बुकिंग 21.62 कोटी रुपये होती, तर पठाण 32.10 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर होता.

  कतरिनाने प्रेक्षकांचे मानले आभार

  चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहून कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट  लिहत, हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले. कतरिना म्हणाली, धन्यवाद आणि चित्रपटगृहात टायगर 3 पहा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)