वाघाला हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर वाघाचा उलट हल्ला; गावात वाघाची दहशत

भटाळी गावात वाघाची दहशत पसरली आहे. वाघाने गाईची शिकार केल्यानंतर गावातून वाघाला हूसकवण्यासाठी गावकरी धावून गेले होते. मात्र, वाघाला हुसकावून लावताना भयानक प्रकार घडला. तो वाघ गावाबाहेर न जाता वाघाने जो आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे गावकऱ्यांनाच घाम फुटला. हा थरार जिल्ह्यातील भटाळी येथे घडला.

    चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूरचे नाव येताच चंद्रपूरातील वाघ डोळ्या समोर उभे राहतात. ताडोबात दिसणारे वाघ आता गाववेशीवर दिसू लागले आहेत. यातून जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.

    भटाळी गावात वाघाची दहशत पसरली आहे. वाघाने गाईची शिकार केल्यानंतर गावातून वाघाला हूसकवण्यासाठी गावकरी धावून गेले होते. मात्र, वाघाला हुसकावून लावताना भयानक प्रकार घडला. तो वाघ गावाबाहेर न जाता वाघाने जो आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे गावकऱ्यांनाच घाम फुटला. हा थरार जिल्ह्यातील भटाळी येथे घडला.

    जिल्ह्यातील भटाळी येथील इरई नदी शेजारी वाघाने गाईची शिकार केली. शिकारीवर वाघ ताव मारीत होता. वाघाचा हल्यात गाय ठार झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. तेव्हा तातडीने गावकऱ्यांनी थेट घटनास्थळ गाठलं. आरडाओरडा करीत वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांना पाहून वाघ अधिकच चवताळला. वाघाने आक्रमक पवित्रा घेतला अन थेट गावकर्यांचाच दिशेने पाऊल टाकले.

    वाघाला आपल्याकडे येतानाचे बघून गावकऱ्यांना घाम सुटला. गावकऱ्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. ही थरारक घटना भटाळी गावात घडली आहे. या घटनेने वाघाची दहशत परिसरात पसरली आहे.