आज वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण; जाणून घ्या काय होणार परिणाम

यावेळी चंद्र हळूहळू पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊ लागेल. त्यानंतर दिवसा 12.30 वाजता हे ग्रहण त्याच्या सर्वोच्च स्थानावर असेल. म्हणजेच, दुपारी 1.04 वाजता, त्याचे संपूर्ण ग्रहणात रूपांतर होईल

    आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ( Solar Eclipse )आहे. हे अंटार्क्टिका खंडावर पूर्णपणे आणि आफ्रिका, नामिबियासह इतर काही देशांमध्ये अंशतः दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे या सूर्यग्रहणाचे धार्मिक महत्त्व राहणार नाही. हे भारतीय वेळेनुसार सकाळी सुमारे 10.59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3.07 वाजता संपेल. भारतात पुढील सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.

    ग्रहण वेळ:
    भारतीय वेळेनुसार, ग्रहण सकाळी 10.59 वाजता सुरू होईल, त्यानंतर ते आंशिक स्वरूपात राहील. यावेळी चंद्र हळूहळू पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊ लागेल. त्यानंतर दिवसा 12.30 वाजता हे ग्रहण त्याच्या सर्वोच्च स्थानावर असेल. म्हणजेच, दुपारी 1.04 वाजता, त्याचे संपूर्ण ग्रहणात रूपांतर होईल आणि यावेळी सूर्याचा 103.6% भाग व्यापला जाईल.ही स्थिती सुमारे 1 मिनिट 57 सेकंद टिकेल. यानंतर, संपूर्ण सूर्यग्रहण कमी होईल आणि दुपारी 1.36 वाजता समाप्त होईल. त्यानंतर आंशिक ग्रहण होईल. यानंतर दुपारी ३.०७ वाजता सूर्यग्रहण पूर्णपणे संपेल.

    अंटार्क्टिकामध्ये संपूर्ण ग्रहण आणि इतरत्र आंशिक ग्रहण
    हे ग्रहण अंटार्क्टिका आणि दक्षिण महासागरातील संपूर्ण सूर्यग्रहण असेल. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन आणि जॉर्ज, नामिबियातील स्वकोपमुंड, मेलबर्न, होबार्ट आणि ऑस्ट्रेलियातील न्यूझीलंडमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे.