
जळगाव : औरंगाबाद रेाडवरील सुप्रीम कॉलनीच्या विस्तारीत भागातील कपडे घेण्यासाठी येत असल्याने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. नंतर अत्याचार करत पीडितेस ब्लॅकमेलिंग करत असल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी संशयीताला अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगावातील फुले मार्केट येथे सोळा वर्षीय मुलगी कपडे खरेदीसाठी येत- जात असताना तिच्याशी दिपक सोनवणे याने ओळख करुन मैत्री केली. मैत्रीनंतर या मुलीशी सलगी करत फुले मार्केट येथे अत्याचार करण्यात आले. नंतर काही दिवसांनी संशयिताने त्याच्या काकाच्या घरी मध्यप्रदेश येथील कखनाटुके ईथळ या गावी नेऊन सलग अत्याचार करुन मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ काढले.
दरम्यान याबाबत वाच्यता केली तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेल. भेटण्यास नकार दिला तर तुझे फोटो व्हायरल करुन बदनामी करेल, अशी धमकी दिल्याने गेल्या दोन वर्षापासून मुलगी अन्याय सहन करत होती. मात्र, प्रकरण हाताबाहेर जात असल्याने अखेर पीडितेने कुटूंबीयांना आपबिती कथन केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद होऊन संशयित दीपक सोनवणे याला अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करत आहेत.