कारचा भीषण अपघात, शिक्षिका महिलेचा जागीच मृत्यू

दुपारी दर्यापूर म्हैसपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहणाने गजभिये यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यात शिक्षिका असलेली भारती गजभिये हिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे पती प्रेम ला डोक्याला गंभीर मार लागला आहे.

    नागपूर (Nagpur) : मुलाची काळजी घेणाऱ्या घरी काम करणाऱ्या युवतीसोबत जातीचा दाखला काढायला जात असतांना दर्यापूर म्हैसपूर फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनात सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात नागपूर येथे राहणाऱ्या शिक्षिकेचा मृत्यू झाला तर तिचा पतीला सुद्धा जबर मार लागला. सुदैवाने यां अपघातात एक युवती आणि चिमुकला बाळ मात्र बचावलं आहे.

    नागपूर गौरखेडा रिंग रोड इथे राहणारे ४५ वर्षीय प्रेम हरिदास गजभिये सह त्यांची ४० वर्षीय शिक्षिका पत्नी भारती गजभिये एक लहान मुलगा आणि मुलाची काळजी घेणारी घरी काम करणारी १७ वर्षीय वंशिका विलास मानकर हे चारचाकी वाहणाने नातेवाईकांच्या वाढदिवसाला वरुड येथे आले होते.

    रविवारी वाढदिवस साजरा करून सोमवारी मुलाची काळजी घेणारी युवती वंशिका चा जातीचा दाखला आणायला वरुड येथून दर्यापूर रस्त्याने अकोला जाण्यास निघाले. यावेळी दुपारी दर्यापूर म्हैसपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहणाने गजभिये यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यात शिक्षिका असलेली भारती गजभिये हिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे पती प्रेम ला डोक्याला गंभीर मार लागला आहे.

    या अपघातात वंशिका मानकर या युवती सुद्धा जखमी झाली. नागरिकांनी सर्वाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मात्र एक वर्षाचा चिमुकला बचावला. प्रेम गजभिये हे नागपूर येथे पत्रकार आहे. त्यांच्या पत्नीला अनेक वर्षापासून मुलं बाळ होत नसल्याने त्यांनी चिमुकला मुलगा दत्तक घेतला होता ही माहिती सूत्राकडून मिळाली आहे.