प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरूणीला आत्महत्येस केले प्रवृत्त

आरोपी हरिदास याचा विवाह झाला आहे. तरी देखील त्याने फिर्यादी यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे बोलावून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यांनतर हरिदास याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा जीव वाचला.

    • विवाहित तरूणाचाही आत्महत्येचा प्रयत्न

    पिंपरी : पहिले लग्न झालेले असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ( Fake love) ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे नेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तसेच तरुणाने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत घडली.

    हरिदास कुंडलिक देवचे (वय २७, रा. जांभुळशी, ता. जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत २२ वर्षीय तरुणीच्या ४५ वर्षीय वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शेती करतात. आरोपी हरिदास याचा विवाह झाला आहे. तरी देखील त्याने फिर्यादी यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे बोलावून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यांनतर हरिदास याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा जीव वाचला. फौजदार शेंडकर तपास करत आहेत.