“झाड” चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

झाडामुळेच आपल्या जीवनाला अर्थ आहे, हे जाणवून देण्यासाठी झाड हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

    जगभरातील वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘झाड’ या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

    योगेश लिलाधर राजपूत यांनी “झाड” या चित्रपटाची निर्मिती केली असून, द ग्रीन इंडिया फिल्म्सचे सुद्धा हे निर्माते आहे. तसेच सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनी केले आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे हे सहदिग्दर्शक आहे. सतीश सांडभोर याची छायांकन आणि शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी या चित्रपटमधील आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली असून, प्रेक्षकांना या चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अश्या उत्कृष्ट कलाकारांची भूमिका पाहायला मिळणार आहे.

    झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तसेच ‘पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र’ असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे. आजवर अनेक चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, परंतु पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेलाय हे फारसं प्रेक्षकांच्या नजरेस आलेले नाही. त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी “झाड” या चित्रपटातून कशी करण्यात आली असेल, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच हा चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.