पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडे लावली पाहिजेत : विठ्ठल नष्टे

हल्ली सगळीकडे वाहनांचा अतिवापर होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यावरण ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडे लावली पाहिजेत आणि सर्वांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असे केंद्रप्रमुख नष्टे यांनी सांगितले.

    अकलूज : हल्ली सगळीकडे वाहनांचा अतिवापर होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यावरण ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडे लावली पाहिजेत आणि सर्वांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असे केंद्रप्रमुख नष्टे (Vitthal Nashte) यांनी सांगितले.

    माझी वसुंधरा अभियानांतर्गत महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात केले. या अभियानांतर्गत प्रशालेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांनी वसुंधरेची शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये झाडांना कुपंण करणे, परिसर स्वछता व ऑनलाइन हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ त्याचबरोबर वसुंधरा संवर्धनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    प्रशालेतील सहशिक्षिका काशीद यांनी वसुंधरा संवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले. यशवंतनगर केंद्राचे केंद्रप्रमुख विठ्ठल नष्टे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तर मुख्याध्यापक शिवाजी पारसे हे अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणात पारसे यांनी माझी वसुंधरा हा शासनाने राबीवलेला उपक्रम विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा असून, आपले भविष्य निरोगी व प्रकृती उत्तम ठेवायची असेल तर पृथ्वीचे संवर्धन करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. असे वसुंधरा संवर्धन व संरक्षण या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

    सूत्रसंचालन देवानंद साळवे तर आभार शकील मुलाणी यांनी केले. हा कार्यक्रम कोरोना नियम-अटी पालन करून घेण्यात आला. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.