‘त्या’ झाडांचे पुनर्रोपण करावे; काँग्रेसची मागणी

पालखी मार्गाच्या निमित्ताने इंदापूर ते बारामती या राज्य रस्त्यालगतची झाडे तोडण्यात येत आहेत. त्याऐवजी त्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात (Trees should be Replanted) यावे, अशी मागणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे केली आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी दै. 'नवराष्ट्र'शी बोलताना दिली.

    इंदापूर : पालखी मार्गाच्या निमित्ताने इंदापूर ते बारामती या राज्य रस्त्यालगतची झाडे तोडण्यात येत आहेत. त्याऐवजी त्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात (Trees should be Replanted) यावे, अशी मागणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे केली आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी दै. ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.
    ते म्हणाले की, इंदापूर तालुक्यात युध्दपातळीवर पालखीमार्गाचे काम चालू आहे. या महामार्गावर गेले कित्येक दशकांपासून चिंच, वटवृक्ष, पिंपळ, निंब याची महाकाय झाडे उभी आहेत. सावली देणारी, पर्यावरणाचा समतोल राखणारी, आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी ही झाडे मोठी होण्यासाठी बऱ्याच वर्षाचा कालावधी गेला आहे. पालखी मार्गाच्या कामासाठी जर ही झाडे तोडली गेली तर सारा समतोल ढासळणार आहे. नवीन पालखीमार्गालगत परत झाडे लावायची म्हटल्यास ती मोठी होण्यास तेवढाच कालावधी लागणार आहे.
    दरम्यानच्या काळात वारकऱ्यांना पोळत्या पावलांनी व डोक्यांनी या मार्गावरुन पंढरीला जावे लागणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, टाळण्यासाठी आमच्या मागणीचा विचार व निर्णय होईपर्यंत वृक्षतोड ताबडतोब थांबवण्यात यावी. झाडांचे पुनर्रोपण करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
    मी व माझे सहकारी झकीरभाई काझी, काकासाहेब देवकर,चमनभाई बागवान, डाॅ. संतोष होगले, भगवानराव पासगे, बापुसाहेब बोराटे, तुषार चिंचकर, महादेव लोंढे, समीर शेख, युवराज गायकवाड आदिंनी मंगळवारी तसे निवेदन तहसीलदारांकडे दिले आहे. वृक्षांच्या पुनर्रोपण केल्यानंतर झाडांपासून होणारे फायदे कायम रहातील. पुढील काळात झाडे लावण्याचा खर्च वाचणार आहे, असे ही सावंत यांनी स्पष्ट केले.