Triple Talaq ... Husband gives triple divorce by urinating on wife's mouth; Because the police were shocked to hear that

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरु पतीने पत्नीच्या तोंडावर लघवी करुन तिला ट्रिपल तलाक (Triple Talaq) दिला. एवढ्यावरच न थांबता या त्याने तिला घराबाहेर काढले. बायकोला तलाक देण्यामागचे कारण ऐकून पोलिसांनीही धक्का बसला. 

    बरेली: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरु पतीने पत्नीच्या तोंडावर लघवी करुन तिला ट्रिपल तलाक (Triple Talaq) दिला. एवढ्यावरच न थांबता या त्याने तिला घराबाहेर काढले. बायकोला तलाक देण्यामागचे कारण ऐकून पोलिसांनीही धक्का बसला.

    पीडित तरुणीचा ७ मार्च २०२१ रोजी मोहम्मद आलमसोबत विवाह झाला होता. पिडीतेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांनी लग्नात घरातील आणि घरातील प्रत्येक वस्तू दिली होती. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्यांनी कमी हुंडा दिला असे सांगून त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर नवराही तिला अनेकदा ‘तू काळी आहेस, तू माझ्या लायक नाहीस’ असे टोमणे मारत असे.

    सासरचे लोक तिच्यावर घरून पैसे आणण्यासाठी दबाव आणत होते असा आरोप पीडितेने केला आहे. माहेरच्यांकडे ती पैशांची मागणी करत नसल्याने तिला उपाशी ठेवून त्रास द्यायचे. चारचाकीची मागणी धुडकावून लावल्याने सासरच्यांनी तिला मारहाण करत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिच्या नवऱ्याने तिचे केस ओढून तिला खाली पाडले आणि छातीवर पाय ठेवत तिच्या चेहऱ्यावर लघवी केली आणि तीन वेळा तलाक म्हणत तिला घराबाहेर हाकलून दिले.

    पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. पतीसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगीतले.