विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न; मोबाइलवर पाठवायचा अश्लील मॅसेज

    नागपूर (Nagpur): ओळखीतील विवाहितेला अश्लील मॅसेज पाठवून तिला त्रास देण्यासोबतच तिचा पाठलाग करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पीडित महिलेले पतीला सर्व हकीकत सांगितल्यानंतर दोघांनी मिळून सदर आरोपी व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

    ही घटना आहे सक्करदरा पोलीस ठाण्यातली. कॅटरिंग व्यवसाय करताना युवतीचे मिथून पाटील याच्याशी चांगले संबंध होते. पण, गेल्या वर्षी तिचे लग्न झाले. तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. तुझ्या पतीला आपल्या जुन्या संबंधाबद्दल सांगेन, अशी धमकी देत होता. भेटायला बोलावत होता.

    तिचे लग्न झाल्यानं ती त्याला भेटू शकत नव्हती. ती नकार देत होती. त्यामुळं मिथूननं तिचा पाठलाग सुरू केला. मोबाईलवर अश्लील मॅसेजेस पाठवित असे. दरम्यान, तिच्या पतीला मिथून तिचा पाठलाग करताना दिसला. तीनं सारी हकिकत पतीला सांगितली. त्यांनी मिथून विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिथूनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.