टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेंच्या चालकाला अटक

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे याचा ड्रायव्हर सुनील घोलप यांच्यासह मनोज डोंगरे याला अटक करण्यात आली आहे.

    पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे याचा ड्रायव्हर सुनील घोलप यांच्यासह मनोज डोंगरे याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना आणखी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने आता तपास करत आहोत.

    तुकाराम सुपे याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट अन्य आरोपींना पाठविण्याचे काम सुनील घोलप हा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती आहे. घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची माहिती आहे.

    दरम्यान, तुकाराम सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अपवर पाठवत होता, हे उघड झाले आहे. पोलिसांनी सुनील घोलप याला अटक केल्याने तुकाराम सुपे याचा आणखी कारनामा उघड होण्याची शक्यता आहे.