एलॉन मस्कचं हे चाललयं काय? आता पुन्हा कर्मचाऱ्यांची करणार हकालपट्टी

एलॉन मस्कनने काही दिवसांपुर्वीच कंपनीतून लोकांना कमी केल्यानतंर आता पुन्हा आणखी कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.

    जगातील आघाडीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी ( Social Media Platform ) एक असलेल्या अशी ओळख असलेल्या ट्विटर ( Twitter ) कंपनीची मालकी एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडे येताच अनेक नवे नवे बदल होता आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीची सुत्र हाती घेताच कर्माचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. एलॉन मस्क यांनी गेल्याच आठवड्यात 50 टक्के नोकरकपात केली. त्यांच्या या निर्णययानंतर अनेकानी मस्क यांना टिका केली. आधी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना कंपनातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कामातून कमी केले. आता पुन्हा मस्क यांना काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणयाचा निर्ण्य घेतला.

    मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर अनेक करमचाऱ्यांचो रजिनामे

    मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळताच अनेक उच्च पदांवरील अधिकारी आणि कंत्राटी कामगारांना कामावरून काढलं. यानंतर बहुतेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. यानंतर मस्क यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देत कामावर राहायचं की राजीनामा द्यायचा हे ठरवा, असा अल्टिमेटम देत ई-मेल केला. यामध्ये कर्मचाऱ्यांना कंपनीचे नवे नियम स्वीकारण्याचा किंवा राजीनामा द्यावा असं सांगण्यात आलं होतं. या अल्टिमेटम नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. एलॉन मस्कच्या वर्क अल्टिमेटमनंतर जवळपास 1,200 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.

    ट्विटरच्या कार्यालयात शुकशुकाट

    मस्क यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देण्याआधी आणि त्यानंतरही ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. यानंतर ट्विटर कंपनीने कार्यालयीन इमारती सोमवारपर्यंत बंद ठेवणार असल्याचं सांगितलं. सोमवारपर्यंत ट्विटर कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचारी इमारतीतील प्रवेशासाठी असलेल्या बॅजची परवानगी काढून टाकेल. तोपर्यत ऑफीसं बंद ठेवण्यात येतील.