
अकोले तालुक्यातील निळवंडे जलाशयाच्या जवळ अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by Drowning) झाल्याची घटना घडली. राजूर येथील समीर शांताराम पवार (वय १४) व सोहम शांताराम पवार (वय ११) या दोन सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अकोले : अकोले तालुक्यातील निळवंडे जलाशयाच्या (Nilwande Dam) जवळ अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by Drowning) झाल्याची घटना घडली. राजूर येथील समीर शांताराम पवार (वय १४) व सोहम शांताराम पवार (वय ११) या दोन सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
राजूर येथील हे दोघे भावंडे आपल्या मुंबई येथील नातेवाईक यांना सोबत घेऊन राजूर येथून फिरण्यासाठी निळवंडे जलाशयावर गेले होते. तेथील पाणी पाहून त्यांना आंघोळीचा मोह आवरला नाही. समीर व सोहम हे दोघे कपडे काढून धरणाजवळील पुलाच्या खाली जाऊन अंघोळीसाठी पाण्यात उतरले. तसे पाण्यात बुडाले. यावेळी त्यांचे नातेवाईक आकाश जाधव व अर्जुन गायकवाड यांनी ही माहिती आकाशने वडिलांना कळविली. त्यानंतर नातेवाईक जमा झाले स्थानिक मच्छिमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात समीर व सोहमचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.
रात्री उशिरा त्यांना समीरचा मृतदेह सापडला. तर सोमवारी सकाळी सोहमचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अकोले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय राजूर येथे समीर हा ९ वी व सोहम ६ वी च्या वर्गात शिकत होता घटनेची माहिती समजातच शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर शोककळा पसरली आहे.