एसटी प्रशासनाचा संपकरी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या घोषणेनंतरही, विलिनीकरणाच्या मागणीवर संपकरी कर्मचारी अडून आहेत. आता सरकारने याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते आहे. एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱअयांना दोन दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. आज किंवा उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत, तर त्या कर्मचाऱ्यांची बडतर्फी परावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या घोषणेनंतरही, विलिनीकरणाच्या मागणीवर संपकरी कर्मचारी अडून आहेत. आता सरकारने याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते आहे. एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱअयांना दोन दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. आज किंवा उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत, तर त्या कर्मचाऱ्यांची बडतर्फी परावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जे कर्मचारी अद्याप निलंबित नाहीत, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.

    विलिनीकरणाच्या मागमीवर संपकरी कर्मचारी ठाम

    गेल्या १५ दिवासंपासून मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन संपवणार नसल्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. अखेरीस काल दिवसभरातील बैठकांवंतर सटी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढीची घोषणा सरकारने केली, या बैठकीला खोत आणि पडलकरही उपस्थित होते. मात्र त्यानंतर हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आज सकाळी याबाबत कर्मचाऱ्यांची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, तरी कर्मचारी विलिनीकीरणाच्या मागणीवरच ठाम असल्याचे सांगण्यात येते आहे.

    विलिनीकरण हा कळीचा मुद्दा 

    विलिनीकरणाची मागणी लगेचच मान्य होईल असे दिसत नाही. याबाबत हायकोर्टाच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली सून, अजून ११ आठवड्यांनंतर हा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. तोपर्त संप सुरु राहू नये यासाठी वेतनवाढीच्या मागणीवर कर्मचाऱ्यांनी समाधान मानावे, असा सरकारचा आग्रह आहे. कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचारी आता खोत आणि पडलकरांचेही ऐकण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे आता संप आणखी किती चिघळणार, हा प्रश्न आहे.