मुंबईतील गोरोगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी!

अशाप्रकारे भिंत कोसळण्याची घटना समोर आल्यामुळे कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे

    मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी (Goregaon Film City) अनेक चित्रपट, मालिकांच शुटींग सुरू असतं. अनेक भागात इंथ लोकांची वर्दळ असते. याच फिल्मसिटीत एक दुर्देवी घटना घडली आहे. फिल्मसिटीत भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

    नेमकं काय घडलं

    मिळालेल्या महितीनुसार, फिल्मसिटीत भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. दोन्ही मृतक हे मजूर असून तिथेचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय घडली? याबाबतची अधिकचा तपशील समजू शकलेला नाही. या घटनेमुळे कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे.