Two lions arrive at Singapore airport; The passengers panicked

एखाद्या विमानतळावर दोन सिंह आले तर कोणाचीही अवस्था वाईट होईल, यात काही शंका नाही. असेच काहीसे घडले सिंगापूरच्या विमानतळावर, जेव्हा एअरपोर्टवर दोन सिंह आल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र काहीच वेळात दोन्ही सिंहांना पकडण्यात आले आणि परिस्थिती आटोक्यात आणली गेली. ही घटना रविवारी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर घडली(Two lions arrive at Singapore airport; The passengers panicked).

    सिंगापूर : एखाद्या विमानतळावर दोन सिंह आले तर कोणाचीही अवस्था वाईट होईल, यात काही शंका नाही. असेच काहीसे घडले सिंगापूरच्या विमानतळावर, जेव्हा एअरपोर्टवर दोन सिंह आल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र काहीच वेळात दोन्ही सिंहांना पकडण्यात आले आणि परिस्थिती आटोक्यात आणली गेली. ही घटना रविवारी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर घडली(Two lions arrive at Singapore airport; The passengers panicked).

    यात पिंजऱ्यात बंद करून विदेशात घेऊन जाण्यात येत असलेल्या सात सिंहांमधील दोन सिंह अचानक बाहेर आले. यानंतर तिथे उपस्थित प्रवाशांना सिंह पिंजऱ्यातून पळाल्याची माहिती मिळताच सगळेच घाबरले. संपूर्ण विमानतळावरील लोकांमध्ये ही बातमी पसरली की विमानतळावर दोन सिंह पिंजऱ्यातून सुटले आहेत. दोन सिंह पिंजऱ्यातून बाहेर निघल्यामुळे प्रशासनही सतर्क झाले.

    यानंतर सिंहांला पकडण्यासाठी एक्सपर्टची टीम बोलावली गेली आणि थोडाही उशीर न करता या सिंहांना पकडण्यात आले. यासाठी ट्रँक्विलायजर बंदुकीचा वापर करावा लागला. एक सिंह बाहेर निघून पिंजऱ्याच्या वरतीच बसला होता. तर दुसरा सिंह आसपास लावण्यात आलेल्या जाळीतच होता. सिंहांना देखरेखीत ठेवण्यात आले आहे. या सिंहांना इतर पाच सिंहांसोबत कंटेनरमध्ये भरून विदेशात घेऊन जाण्यात येत होते. मात्र या सिंहांना कुठून कुठे नेले जात होते, हे समोर आलेलं नाही. या सिंहांना विदेशात पोहोचवण्याची जबाबदारी सिंगापूर एअरलाईन्सकडे होती.