मरवडे येथे चिमुकल्या बहिणींचा अकस्मात मृत्यू; विषबाधा झाल्याचा संशय

या मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या अकस्मात मृत्यू अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

    मंगळवेढा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील मरवडे येथे दोन चिमुरड्या बहिणींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून, यात विषबाधेचा संशय व्यक्त होत आहे.

    बुधवारी (दि.२२) आबासो चव्हाण यांनी मंगळवेढा द येथून श्रीखंड आणला होता. श्रीखंड खाल्ल्यानंतर दोन्ही मुलींना त्रास सुरू झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मोठी मुलगी स्वरा आबासो चव्हाण (वय ६) हिचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर छोटी मुलगी नम्रता हिचाही गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या दोन सख्ख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्युमुळे मरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    या मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या अकस्मात मृत्यू अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

    मुलींच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील गूढ उलगडू शकणार आहे. या दुर्दैवी मुलींचे वडील आबासो चव्हाण हे स्कूल बसचालक आहेत. हुलजंती, म रवडे आदी भागातील शेकडो लहान मुलांना ते मंगळवेढा येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ने – आण करण्याचे काम करतात. लहान मुलांचे लाडके चालक म्हणून ते ओळखले जातात. त्यांना या दोन मुलीच होत्या.

    मुलगा नसल्याने त्यांनी मुलगा समजून त्यांचे संगोपन केले होते. मात्र, त्यांच्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.