जळगावमध्ये भीषण अपघात! बस रस्त्याच्या कडेला उलटली, दोन प्रवाशांचा मृत्यू, दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी

या अपघातात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जवळपास दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

    जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) मोठा अपघात (Bus accident) घडल्याची बातमी समोर येत आहे. मुंबई- नागपूर महामार्गावरील एंरडोल(Erandol) तालुक्यात हा अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून जवळपास दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर स्थानिक आणि पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

    कुठं घडला अपघात?

    गेल्या काही दिवसापासून राज्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी समृध्दी महामार्गावर भीषण अपघात घडून अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही राज्यात अपघाताचं सत्र सुरूच आहे. आता जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ मुंबई-नागपूर (Mumbai Nagpur Highway)  एक खासगी बस दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते, यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    कसं घडला अपघात?

    आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ खासगी बस प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितल जात आहे. आधी बस दुभाजकावर आदळली त्यानंतर थेट पुलावरून खाली कोसळली. यात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे.