दक्षिण सोलापूरमध्ये सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरखाली चेंगरून विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू

  सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील बस स्टॉपवर सिमेंट वाहतूक करणारा बलगर अचानक पलटी झाला. त्याखाली चेंगरून औज गावातील विठ्ठल शिंगाडे (वय वर्षे 60), शालेय विद्यार्थी प्रज्ञा दोडतले (वय वर्षे 12), महेश इंगळे अंदाजे वय वर्षे 16, अनिल चौधरी (वय वर्षे 50) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ‘रास्ता रोको’ केला असून, सिमेंटच्या वाहनांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट वाहतूक करण्यासाठी आरटीओ परवानगी कसा देतो? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आपल्या यंत्रणेला तात्काळ घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सूचना केल्या आहेत.
  सिमेटची वाहतूक करणारा बलकर
  ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली. सिमेंटचे बलकर अतिशय वजनदार असल्याने एका एकाने भेटलो नाही. दोन क्रेन मागून गाडी बाजूला करण्यात आली. त्यानंतर गाडीखाली चिरडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. मदत कार्य बऱ्याच वेळ सुरू राहिले.
  घटनास्थील पोलिसांची धाव
  घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, बीडीओ बाळासाहेब वाघ, दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले, मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील पोलिस कर्मचारी, महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत.
  दुर्घटनेतील मृतांना आर्थिक मदत

  औज दुर्घटनेतील मृतांना आर्थिक मदत देऊन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आदेश  दिले आहेत. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत, संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत घटना कानावर टाकताच मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना मदतीचे व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत