
धुळवडीनिमित्त सर्व ठिकाणी उत्साहात सण साजरा होता असताना डोंबिवली पश्चिमेतील सात पूल परिसरात काही तरुण भिवंडीहून मोठा गाव येथ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बसलेल्या काही तरुणांनी शिवीगाळ केली. ओंकार माळी आणि अभिषेक भोईर यांनी जाब विचारला असता त्यांना बियरच्या बाटल्याने आणि लाकडी दांडक्याने दहा ते पंधरा जणाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली.
कल्याण: डोंबिवली (Dombivali) दहशत माजविण्यासाठी काही तरुणांना विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीतील सातपूल परिसरात घडली होती. या घटनेत ओंकार माळी आणि अभिषेक भोईर या दोन तरुणा गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी (Vishnunagar Police) स्वयंघोषित डॉन आणि त्याच्या पंधरा साथीदारांच्या विरोधात जीवे ठारण्याचा प्रयत्नाच्या आरोपाखाली गुन्हा (Crime) दाखल केला आहे. हा प्रकार रेल्वे ट्रॅकच्या हद्दीत झाला असल्याने पुढील तपास डोंबिवली जीआरपी (Dombivali GRP) करणार आहे.
काल धुळवडीनिमित्त सर्व ठिकाणी उत्साहात सण साजरा होता असताना डोंबिवली पश्चिमेतील सात पूल परिसरात काही तरुण भिवंडीहून मोठा गाव येथ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बसलेल्या काही तरुणांनी शिवीगाळ केली. ओंकार माळी आणि अभिषेक भोईर यांनी जाब विचारला असता त्यांना बियरच्या बाटल्याने आणि लाकडी दांडक्याने दहा ते पंधरा जणाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात फोडली. त्यांच्या डोक्याला पंधरा टाके पडले असून त्यांच्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या प्रकरणी सचिन म्हात्रे, प्रथम भोईर, महेश चारसे, राम्या म्हात्रे, लात्या म्हात्रे, सुस्ते आंबेकर यांच्यासह अन्य आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रेल्वे ट्रॅकच्या हद्दीत घडल्याने याचा पुढील तपास डोबिवली जीआरपी करणार आहे.