त्रिशंकू भागात सातारा विकास आघाडीकडून समत्वभावाने विकास : उदयनराजे भोसले

सातारा विकास आघाडीने (Satara Vikas Aghadi) त्रिशंकू भागामध्ये समत्वभावाने विकास साधण्याची भूमिका ठेवली आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्याने कटिबद्ध राहणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले.

    सातारा : सातारा विकास आघाडीने (Satara Vikas Aghadi) त्रिशंकू भागामध्ये समत्वभावाने विकास साधण्याची भूमिका ठेवली आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्याने कटिबद्ध राहणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले.

    सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, डी. जी. बनकर, विलासपूर परिसरातील संग्राम बर्गे, बुवा सुर्यवंशी, किरण नलवडे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थित होते.

    उदयनराजे पुढे म्हणाले, लोकोपयोगी कामे आणि सेवा सुविधा नागरीकांना उपलब्ध करुन देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्यच आहे. याच धोरणेतून आम्ही नेहमीच कार्यरत राहिलो आहोत. तसेच विकास ही सातत्याने घडणारी क्रिया आहे. तथापि, समतोल आणि समत्वभावाने विकास साधणे महत्वाचे आहे. त्याच दृष्टीकोणातून सातारा विकास आघाडीची आत्तापर्यंत वाटचाल राहिली आहे. अपपरभाव ठेवून केलेल्या विकासाला विकास म्हणता येणार नाही. सातारा विकास आघाडीने कधीही हा माझा, तो माझा असा भेदभाव न ठेवता, नागरिकांना केंद्रबिंदू मानून सेवा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक मान्यवरांच्या हस्ते रामराव पवार नगर, स्वराज्य नगर, नंदादिप सोसायटी, शिवप्रेमी कॉलनी, जगदाळे बाग, मोरे कॉलनी, सहजीवन सोसायटी, इंदिरा नगर, फॉरेस्ट कॉलनी, यशोदा नगर आदी ठिकाणी रस्ते डांबरीकरण, आरसीसी ड्रेनेज व्यवस्था, नाना-नानी पार्क आदी कामांच्या भूमिपूजनचा शुभारंभ करण्यात आला.

    यावेळी राहुल पाटोळे, विलास उर्फ नाना शिंदे, आबा शिंदे, काका बागल, उदय मराठे, धनेश खुडे, विजय पवार, विठ्ठल जाधव, अमोल कदम, किरण बाबर, अमेय घाडगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे मोटे, नलवडे, वाघ, संजय चव्हाण, विक्रम पवार, राम मदाळे, गिरिष काकडे, ऍड. विकास पवार, महेश चव्हाण या कार्यकत्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.