Regarding the accident at Wardha, Chief Minister Shri. Sympathy expressed by Uddhav Thackeray

९० च्या दशकात आपले विचार, राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ मध्ये 'सामना' दैनिकाची सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली.

    मुंबई : दैनिक ‘सामना’च्या (Daily Samana) मुख्य संपादकपदाची (Chief Editor) धुरा पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे संपादकपदाची जबाबदारी दिली होती. त्यापूर्वी, खुद्ध उद्धव ठाकरे मुखपत्राचे संपादक होते, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ (Oath Of CM Post) घेण्याआधी त्यांनी या पदाचा राजीनामा (Resignation) दिला. मात्र, आता त्यांनी पुन्हा ही जबाबदारी स्विकारली आहे.

    ९० च्या दशकात आपले विचार, राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९८८ मध्ये ‘सामना’ दैनिकाची सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली.

    २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत २९ नोव्हेंबर २०१९ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी सामना संपादकपदाची धुरा पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली. दरम्यान, राज्यात सत्तानाट्यानंतर कट्टर एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत भाजपसोबत जात नवे सरकार स्थापन केले. सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.