वीज बिल भरणे शक्य नसल्याने शेतकऱ्याने लावला गळफास

आवाढव्य विज बिल त्यामुळे कृषी पंपाचे थकित विज बिल कुठुन भराचे‌ व ऐवढा पैसा कुठून आनावा या विवचनेत असलेला तरूण शेतकरी ईश्वर काशीराम भुसारी वय ३८.रा.तावशी याने घरच्या मागे असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची माहिती आहे,

    दिघोरी/मोठी (Dighori / Mothi) : शेतातील मोटार पंपाचे थकित विज बिल कसे भरायचे ऐवढा पैसा आनायचा तरी कुठुन या चिंतेत असलेल्या एका तरूण शेतकर्यांने इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने घरामागील सादंवाडित असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दिघोरी(मोठी)पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तावशी गावात २७ नोव्हेंबर सकाळी ४च्या सुमारास घडली,ईश्वर काशीराम भुसारी वय ३८वर्षे रा.तावशी त.लाखांदुर.जी.भंडारा असे मृतकाचे नाव आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शततची नापिक,दुष्काळ व कोरोणा महामारीमुळे गेल्या दोन वंर्षापासुन व्यंवसाय नाही,काम नाही,त्यामुळे परिवाराचा उदनिर्वाह करणे कठीन त्यात विद्युत महामंडळाचे ”नाका पेक्षा मोती जळ”असे आवाढव्य विज बिल त्यामुळे कृषी पंपाचे थकित विज बिल कुठुन भराचे‌ व ऐवढा पैसा कुठून आनावा या विवचनेत असलेला तरूण शेतकरी ईश्वर काशीराम भुसारी वय ३८.रा.तावशी याने घरच्या मागे असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची माहिती आहे, मृतक ईश्वर कडे शेतात कृषीपंपाचे विजबिल व राहत्या घराचे विजबिल दोन्ही मिळुन चाळीस हजार(४०,०००,) रुपये विजबिल थकित असल्याची माहिती आहे.