पाठलाग करत असल्याचे समजताच चोरट्याने पोलिसावर केला खुनी हल्ला

पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले (वय 42) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू खेमु राठोड (वय 39, रा. उजनी, एकंबी, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पिंपरी (Pimpri) : सोनसाखळी चोरून पळून जाणाऱ्या संशयित आरोपीचा एका पोलीस हवालदाराने पाठलाग केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे समजताच चोरट्याने पोलिसावर चाकूने वार करून डोळ्यात स्प्रे मारत त्यांच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.

    पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले (वय 42) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू खेमु राठोड (वय 39, रा. उजनी, एकंबी, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू राठोड हा सोनसाखळी चोरून पळून जात असल्याचा फिर्यादी पोलीस हवालदार ढोले यांना होता. त्यामुळे ढोले यांनी राजुचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना ढोले यांनी आपण पोलीस असल्याचे राजुला सांगितले. त्यावेळी राजुने जर्किनमध्ये ठेवलेला चाकू काढला आणि ढोले यांच्यावर वार केले. ढोले यांनी वार चुकवला. त्यावेळी पोलीस मित्र राकेश हगवणे हे ढोले यांच्या मदतीला आले. आरोपी सोबत झटापटी चालू असताना आरोपीने पोलीस हवालदार ढोले आणि पोलीस मित्र राकेश हगवणे यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांना जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.