Uttar Pradesh Assembly elections: 50 women included in the list of first 125 Congress candidates announced by Priyanka Gandhi; BJP will also field 300 candidates

उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, सर्वात पहिली उमेदवारांची यादी काँग्रेसेने जाहीर करत आघाडी घेतली आहे. काँग्रेसकडून १२५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात ५० महिलांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी ही यादी जाहीर केली आहे(Uttar Pradesh Assembly elections: 50 women included in the list of first 125 Congress candidates announced by Priyanka Gandhi; BJP will also field 300 candidates).

  नवी दिल्ली : उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, सर्वात पहिली उमेदवारांची यादी काँग्रेसेने जाहीर करत आघाडी घेतली आहे. काँग्रेसकडून १२५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात ५० महिलांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी ही यादी जाहीर केली आहे(Uttar Pradesh Assembly elections: 50 women included in the list of first 125 Congress candidates announced by Priyanka Gandhi; BJP will also field 300 candidates).

  उमेदवारी दिलेल्या या ५० महिला अशा आहेत की ज्यांनी योगी सरकारच्या काळात अत्याचार सहन केला असल्याचे प्रियंका यांनी सांगितले आहे. प्रियंका गांधी या निवडणुकीत महिलांच्या मतदानाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे ठरविले आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी ‘लडकी हू, लड सकती हू’ असा नारा दिला आहे.

  प्रियंका गांधीही निवडणूक लढवणार ?

  या निवडणुकीत प्रियंका गांधीही प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या यादीत जरी त्यांच्या नावाचा समावेश नसला तरी त्या भाजपाच्या एखाद्या हेवी वेट नेत्यासमोर उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीच्या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

  भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत ३०० उमेदवार निश्चित होणार

  या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. यात पक्षाला लागलेली गळती, प्रचाराचे मुद्दे, प्रक्रिया यावर चर्चा अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठल्या मतदरारसंघातून निवडणूक लढवणार, हेही आजच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. यासह ३०० उमेदवारांच्या नावांवरही शिक्कामोर्तब होण्याची आशा आहे.

  या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मित शाह, योगी आदित्यनाथ, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर आणि स्वतंत्र देव हे उपस्थित असतील. यात मोदी, राजनाथ सिंह आणि नड्डा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असणार आहेत.

  हे सुद्धा वाचा
  • 2022