रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायावर वज्रलेपन, उद्यापासून पायाचं दर्शन सुरु होण्याची शक्यता

तसंच विठ्ठल मूर्तीची थोडी झीज झाली असून गरज वाटल्यास मूर्तीवरही लेपन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.

    पंढरपूर : संपूर्ण महराष्ट्रातील जनतेचं आराध्या दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आलं आहे. विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याच निर्दशनास आल्यामुळे मुर्तीच्या पायावर लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लेपन प्रक्रिया सुरु असून उद्यापासून रुक्मिणी मातेच्या पायाचं दर्शन सुरु होण्याची शक्यता आहे.

    आषाढी एकादशी काही दिवसांवर आलीये. यानिमित्त्य भाविक मोठ्याप्रमाणात विठ्ठल चरणी नतमस्तक होतात.
    मात्र, पायावर डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची बाब समोर आल्याने आता वज्रलेप लावण्यात येत आहे. वज्रलेप लावण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. साधारणतः दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या आधीही वज्रलेपाची प्रक्रिया करण्यात आली होती, मात्र अपुऱ्या वेळामुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. आता पुन्हा या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. तसंच विठ्ठल मूर्तीची थोडी झीज झाली असून गरज वाटल्यास मूर्तीवरही लेपन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.