भीमगोंडा पाटील सोसायटीत विकास पॅनेलची बाजी

अब्दुललाट (ता.शिरोळ) येथील भीमगोंडा पाटील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भी. रा. पाटील विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. या पॅनेलने विरोधी संस्थापक बहुजन विकास पॅनेलचा (Bahujan Vikas Panel) दारुण पराभव केला.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अब्दुललाट (ता.शिरोळ) येथील भीमगोंडा पाटील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भी. रा. पाटील विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. या पॅनेलने विरोधी संस्थापक बहुजन विकास पॅनेलचा (Bahujan Vikas Panel) दारुण पराभव केला.

    अब्दुललाट येथील भीमगोंडा पाटील विकास सेवा संस्थेची निवडणूक ईर्षेने पार पडली. या संस्थेचे ५१५ सभासद आहेत. त्यापैकी ४९५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बिनविरोधपणे दरवेळी संस्थेची निवडणूक पार पडत होती.परंतु यावेळी भीमगोंडा पाटील (काका) संस्थापक बहुजन विकास पॅनेल विरुद्ध भीमगोंडा पाटील विकास पॅनेल यांच्यात लढत झाली.

    त्यामध्ये विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकून आपले वर्चस्व राखले. विकास पॅनेलचे संजय पाटील रमेश पाटील, भीमगोंडा पाटील, अनिल गोटखिंडे, अण्णासो नायकुडे, अशोक बोरगावे, तातोबा पाटील , सतीश कोळी, अश्विनी पाटील,भोपाल मोहिते, रत्नाप्पा कुंभार, तर विरोधी बहुजन पॅनेलकडून वीणा पाटील व मारुती बंडगर विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक प्रेमकुमार राठोड यांनी काम पाहिले.