एक गाव गाजराचं; ७५ % शेतकरी पिढ्यानपिढ्या करतात गाजराची शेती

पारंपारीक रब्बी पिकामुळे गाजराचे गाव म्हणून भांडगावाची नवी ओळख निर्माण झाली आहे. या गावात साधारण दोनशे हेक्टरवर सेंद्रीय पद्धतीने रब्बी पिक म्हणून गाजराचे पीक घेतले जाते.

    उस्मानाबाद – उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातील भांडगाव. महाराष्ट्रात नागपूर संत्रीसाठी, नाशिक द्राक्षांसाठी व कांद्यासाठी तर पैठण मोसंबीसाठी म्हणून परिचीत आहे. त्याप्रमाणे पारंपारीक रब्बी पिकामुळे गाजराचे गाव म्हणून भांडगावाची नवी ओळख निर्माण झाली आहे.

    बार्शीपासून १५ कि. मी. अंतरावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या भांडगावची नवी ओळख निर्माण होत आहे. या गावात साधारण दोनशे हेक्टरवर सेंद्रीय पद्धतीने रब्बी पिक म्हणून गाजराचे पीक घेतले जाते. अत्यल्प पाणी, फवारणी, खताची अवशकता नाही. खुरपणी नाही पण गाजर काढणीतून महिलांना रोजगार, जनावरांना चारा मिळतो तसेच कमी खर्चात एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याने गाजराची शेती करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे येथील शेतकरी धनंजय अंधारे यांनी सांगीतले.