अखेर विराटच्या जबरा फॅनचं झालं लग्न, विराट कोहलीच ठरला कारणीभूत, घेतली होती खतरनाक शप्पथ. घ्या जाणून!

एका वर्षापूर्वी किंग कोहलीच्या या फॅननं एका मॅचमध्ये पोस्टर लिहून त्याची शपथ जगजाहीर केली होती. त्यानंतर आता त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय. त्यानंही आपली शपथ पूर्ण झाल्यानंतरच लग्न केलं.

    नवी दिल्ली – क्रिकेटर्सचे (cricket) चाहते प्रचंड असतात आणि त्यांच्या मनात क्रिकेटर्स बाबत असलेलं वेडही भयंकर असतं. विराटच्या एका फॅनची (Virat Kohli fan) ही अशीच एक कहाणी आहे. टीम इंडियाचा आधारस्तंभ विराट कोहली सध्या पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचं दिसतंय. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीचा झंझावात पुन्हा एकदा सगळ्यांना पाहयाला मिळालाय. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं आंतरराष्ट्रीय करियरमधली ७४ वी सेंच्युरी (Century) ठोकली. कोहलीला त्याचा फॉर्म परत गवसल्यानं, त्याच्या एका चाहत्याला फार मोठा लाभ झाला आहे. कोहलीच्या या चाहत्यानं अशी शपथ घेतली होती की, कोहली जोपर्यंत ७१ वी सेंच्युरी करणार नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही. आता विराटनं हा विक्रम गाठल्यानं या चाहत्याच्या लग्नाचा (Virat Kohli Fan Marriage)  मार्ग मोकळा झालाय.

    एका वर्षापूर्वी सार्वजनिक ठिकाणी घेतली शपथ

    एका वर्षापूर्वी किंग कोहलीच्या या फॅननं एका मॅचमध्ये पोस्टर लिहून त्याची शपथ जगजाहीर केली होती. आता त्याच्या लग्नाच्या दिवशीच कोहलीनं ७४ वी सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर कोहलीच्या या फॅननं टीव्हीवर मॅच सुरु असतानाचा, त्याचा शेरवानीतला फोटो ट्विट केला. त्यानंतर आता त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय. या फॅनचे नाव आहे अमन अग्रवाल (aman Agarwal). त्यानंही आपली शपथ पूर्ण झाल्यानंतरच लग्न केलं.

    कोहलीनं सेच्युरींचा दुष्काळ संपवला

    गेल्या ३ वर्षांपासून विराटचा बॅड पॅच सुरु होता. तीन वर्षांनी त्यानं सेंच्युरींचा पडलेला दुष्काळ संपवलाय. अफगाणिस्थानाविरोधात सेंच्युरी करत त्यानं फॉर्ममध्ये परत आल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर बांग्लादेश आणि श्रीलंकेविरोधात त्यानं दोन सेंच्युरी केल्या. गेल्या ४ मॅचमध्ये विराटनं तीन सेंच्युरी केल्यात. अमननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की- आपण केवळ ७१ व्या सेंच्युरीची अपेक्षा ठेवली होती, विराटनं तर माझ्या लग्नाच्या दिवशी ७४ वी सेंच्युरीही केलीय. आता न्यूझीलंडविरुद्धचा सीरिजमध्येही कोहलीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. त्याच्या नाववार ४६ सेंच्युरी आहेत, लवकरच त्यानं सचिनचा ४९ सेंच्युरींचा विक्रम मोडावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.