उमरेड रोडवरील पांडव कॉलेजसमोर एका खासगी बसने पाच वर्षीय मुलाला धडक दिली. बस भरधाव वेगात असल्याने ही धडक इतकी जबर होती की तो मुलगा जागीच गतप्राण झाला. शुभम साजन काकडे असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव असून तो पारशिवनी येथील रहिवासी आहे.
नागपूर (Nagpur) : एका भरधाव बसने पाच वर्षांच्या मुलाला चिरडल्याची घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत तो मुलगा जागीच ठार झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नागरिकांनी बसवर दगडफेक केली आहे.
उमरेड रोडवरील पांडव कॉलेजसमोर एका खासगी बसने पाच वर्षीय मुलाला धडक दिली. बस भरधाव वेगात असल्याने ही धडक इतकी जबर होती की तो मुलगा जागीच गतप्राण झाला. शुभम साजन काकडे असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव असून तो पारशिवनी येथील रहिवासी आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन संतप्त जमावाला शांत करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.