अनेक अतृप्तांनी केला राजकीय हिशेब ‘चुकता’ ; दिंडाेरीत मतदारांनी दिला ‘परिवर्तना’चा धक्का

प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच उत्कर्ष पॅनलची राजकीय सि्थती फारशी चांगली नव्हती. तालुक्याच्या कोणत्याही निवडणुकीत एकाच व्यासपीठावर दिसणारे व सार्वजनिक कार्यक्रमात सतत बरोबर असणारे नामदार नरहरी झिरवाळ, श्रीराम शेटे, गणपत पाटील हे राजकीय फेस व्हॅल्यू असलेल्या नेत्यांपैकी गणपत पाटील यांनी तर उघडपणे परिवर्तन पॅनलचे नेतृत्व केले.

    प्रवीण दाेशी, वणी : दिंडाेरी तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत परिवर्तनाच्या धक्क्याने येत्या काळात हाेेऊ घातलेल्या निवडणुकीची गणिते बदलणार आहेत. सत्ताधारी दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी उत्कर्ष पॅनलचा पराभव परिवर्तनने करून माेठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट दत्तात्रय पाटील यांच्याबराेेबर तर दुसऱ्या बाजूला एक गट असे चित्र हाेेते. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा पराभव केल्याची चर्चा रंगणार आहे.

    दिंडाेरी बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी सुरूवातीपासूनच रस्सीखेच सुरू हाेेती. परिवर्तनच्या प्रचाराचा नारळ फाेेडले त्या दिवशी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले हाेेते. त्यामुळे बाजार समितीत सत्तांतर हाेणार, अशी चर्चा तेव्हाच सुरू झाली हाेती. अचूक नियोजन, मतदारांना भूिमका पटवून देणे, मतदानापर्यंत मतदारांशी संपर्क, कार्यकर्त्यांनी घेतलेले मेहनत यामुळे परिवर्तन घडविणे उमेदवारांना साेपे झाले हाेते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या कारभारावरून दुखावल्या गेलेल्यांना हिशेब चुकता करण्याची आयतीच संधी या निमित्ताने मिळाली हाेती. त्यांनीदेखील याेग्य ताे ‘हिशेब’ चुकता करत दत्तात्रय पाटलांना पराभवाचा धक्का दिला.

    प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच उत्कर्ष पॅनलची राजकीय सि्थती फारशी चांगली नव्हती. तालुक्याच्या कोणत्याही निवडणुकीत एकाच व्यासपीठावर दिसणारे व सार्वजनिक कार्यक्रमात सतत बरोबर असणारे नामदार नरहरी झिरवाळ, श्रीराम शेटे, गणपत पाटील हे राजकीय फेस व्हॅल्यू असलेल्या नेत्यांपैकी गणपत पाटील यांनी तर उघडपणे परिवर्तन पॅनलचे नेतृत्व केले. त्यावेळी शेतकरी उत्कर्षचा पराभव हाेताे की काय? अशी भीती राजकीय जाणकारांतून व्यक्त हाेत हाेती. त्यात भरीस भर म्हणून नरहरी झिरवाळ व श्रीराम शेटे यांनी घेतलेली अलिप्त व तटस्थ भूमिका हेही महत्वाचे उत्कर्षच्या पराभवाचे कारण आहे. मविप्र निवडणुकीत दत्तात्रय पाटील यांनी घेतलेली उघड भूमिका तसेच किरकोळ बाबीत प्रतिष्ठा पणाला लावून अस्तित्वाचा प्रभाव दाखविण्याची भूमिका तसेच इतर नेत्यांची नाराजी अशा सर्वांनी शेतकरी उत्कर्षचे पानीपत करण्यासाठी प्रयत्न केले, हे उघड गुपीत आहे.

    सर्वात महत्वाचे म्हणजे क्राॅस व्होटींग व बाद झालेल्या मतांच्या आकडेवारी माेठी असल्याने त्याचाही फटका उत्कर्ष पॅनलला बसला हे नाकारुन चालणार नाही. क्राॅस व्होटींग करताना मतदारांनी निशाण्या पाहण्याऐवजी नावे वाचून मतदान केले. त्या गडबड व घाईगर्दीत बाद, अवैध मतांची संख्या वाढली गेली व ही संख्या शेतकरी उत्कर्षाच्या पराभवाची कारणे ठरली. सोसायाटी गटातील अवैध मते सहकारी संस्था मतदार संघ एकूण वैध मते ६५३ तर अवैध मते ४० ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण जागा एकूण वैध मते १,०५५ तर अवैध मते ३७ सहकारी सःस्थेचा मतदार संघ विमुक्त जाती, भटक्या जमाती वैध मते ६६५ तर अवैध मते २८ सहकारी संस्थेचा मतदार संघ इतर मागास प्रवर्ग वैध मते ६८० तर अवैध मते १३ ग्रामपंचायत मतदार संघ अनूसूचित जाती जमाती जागा वैध मते १,०१४ तर अवैध मते ७८ ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक वैध मते १,०२३ तर अवैध मते ६९, व्यापारी मतदार संघात २ तर हमाल व तोलारी मतदार संघात एकही अवैध मत नाही. अशी ही आकडेवारी आहे.

    दरम्यान सहकारी संस्थेचा मतदारसंघ व सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघ, अनूसूचित जाती-जमाती ग्रामपंचायत मतदार संघ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ग्रामपंचायत मतदार संघ यांच्या अवैध मतातील आकडेवारी माेठी आहे. जर हीअवैध मते शेतकरी उत्कर्षाला मिळाली असती चित्र वेगळे दिसले असते. मात्र राजकारणात जर तरला काही महत्त्व नाही, हेच वास्तव आहे. मतदारांनी दिलेला काैल स्वीकारून पुढे वाटचाल करावी लागते. पराजय पचवून नव्या जोमाने, एकदिलाने विकासात्मक मार्गदर्शक भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या दृषि्टकाेनातून घेणे सकारात्मक ठरेल.

    या निवडणुकीच्या माध्यमातून प्रशांत कड, कैलास मवाळ, गंगाधर निखाडे, नरेंद्र जाधव, योगेश बर्डे व सहकारी मित्रांना विकासात्मक काम करण्यास भरपूर वाव आहे. नरेंद्र जाधव व योगेश बर्डे, शाम बोडके हे भारतीय जनता पार्टीचे असून, राष्ट्रवादी बरोबर निवडणूक लढवून विजय मिळविला आहे. विजयानंतरही केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, विकासात्मक बाबीचे निराकारण करणे अपेक्षित आहे. तसेच राज्यातही भाजप सत्तेत असल्याने सकारात्मक दृष्टीकोनही ठेवावा, अशी अपेक्षा मतदारांनी ठेवली तर ती वावगी ठरु नये.