कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर नगरपंचायतीसाठी चुरशीने ८२ टक्के मतदान

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. एकूण ३९ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये १२५ उमेदवार रिंगणात होते आणि अत्‍यंत चुरशीने तिन्ही नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सरासरी ८२ टक्के इतक्‍या मतदानाची नोंद झाली आहे.

  सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. एकूण ३९ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये १२५ उमेदवार रिंगणात होते आणि अत्‍यंत चुरशीने तिन्ही नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सरासरी ८२ टक्के इतक्‍या मतदानाची नोंद झाली आहे.

  कडेगाव नगरपंचायतीसाठी सरासरी 79.93 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर खानापूर नगरपंचायतीसाठी सरासरी 85.93 टक्के मतदानाची नोंद झाली आणि संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी चुरशीने 82 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याठिकाणी रोहित आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचा एक गट अशा आघाडीमध्ये लढत झाली आहे.

  नगरपंचायतनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे :

  कडेगाव – (पुरूष 3142, स्त्री 3100 , एकूण 6242),
  खानापूर – (पुरूष 1754, स्त्री 1615 , एकूण 3369 ),
  कवठेमहांकाळ – (पुरूष 4014, स्त्री 3749, एकूण 7763).