वाडिया रुग्णालयात आग; मोठी दुर्घटना टळली, अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण

वाडिया बाल रुग्णालयात (wadia hospital) सायंकाळी 6.50 च्या सुमारास आग (fire) लागली. आणि एकच धांदल उडाली. रुग्णांना आजूबाजूच्या वॉर्ड मध्ये हलविण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल (fire bridge) घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी केवळ दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

    मुंबई : लहान मुलांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात (wadia hospital) सायंकाळी 6.50 च्या सुमारास आग (fire) लागली. आणि एकच धांदल उडाली. रुग्णांना आजूबाजूच्या वॉर्ड मध्ये हलविण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल (fire bridge) घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी केवळ दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

    परळ मधील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटर च्या शेजारी असलेल्या इन्व्हर्टर बॅटरी रूमला सायंकाळी 6.50 च्या सुमारास आग लागली. त्यानंतर रुग्णालयात एकच धांदल उडाली. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना अन्य वॉर्ड मध्ये हलविले. आणि त्याच सोबतच पहिल्या मजल्यावरील लाईट्स बंद केल्या. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटना स्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सहा फायर स्टेशन वरून तब्बल 11 गाड्या तसेच 5 टँकर घटनास्थळी दाखल झाले.

    दरम्यान, इन्व्हर्टर बॅटरी रूममधील इन्स्टॉलेशन, सेंट्रल ए.सी, लाकडी पार्टिशन या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे धुराचे लोट दोन मजल्यांपर्यंत पोहचले. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येऊ नये म्हणून अग्निशमन दलाकडून तातडीने दरवाजे आणि खिडक्या फोडून धुर बाहेर जाण्यास वाट मोकळी केली. अशी माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पवार यांनी दिली.