सार्वजनिक बांधकाम विभागाची अतिक्रमण मोहीम तीव्र; वाई-पाचवड रस्ता अतिक्रमणमुक्त

अतिक्रमण काढण्याचे काम पोलीस बंदीबस्तामध्ये चालू आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच, उपसरपंच पाचवड ग्रामपंचायत तसेच गरमपंचयात सदस्य यांची चांगली मदत झाली आहे.

  वाई : वाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र केली असुन शुक्रवारी जोर -वाई -पाचवड (प्र जि मा 19) या प्रमुख रस्त्यावरील पाचवड गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक वर्षांची अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आली. यामध्ये लोखंडी फलक, पत्र्याचे शेड, टपऱ्या व दुकाने यांचा समावेश आहे.

  बांधकाम विभाग ‘अक्टिव्ह’ झाल्याने अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकाचे धाबे दणाणले आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून आत वाईच्या दिशेने आत येत असताना पाचवड फाट्यावर व पुढे वाईच्या दिशेने दुतर्फा अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अतिक्रमण काढण्याची बऱ्याच दिवसापासून मागणी ही होत होती. सध्या पाचवड गावातील गटरचे काम व रास्ता रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत होत असल्यामुळे त्याला अडथळा करणाऱ्या एकूण १११ सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांना अतिक्रमन हटवण्याबाबत नोटीससा दिल्या होत्या. या नोटिसमध्ये २२ डिसेबरपर्यत केलेली अतिक्रमणे स्वखर्चाने काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या मुदतीत अतिक्रमण न काढलेस सार्वजनिक विभागामार्फत २४ डिसेंबरपासून सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

  सहाय्यक अभियंता (श्रेणी 1) श्रीपाद जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 24 तारखेपर्यंत बऱ्यापैकी प्रदिसाद अतिक्रमणधारकाकडून मिळाला. बरीच अतिक्रमणे स्वतःहून हटविण्यात आली उर्वरित अतिक्रमणे आज हटविण्यात येत आहेत आणि एकूण १११ अतिक्रमणे काढून टाकण्याचे काम चालू आहे. अतिक्रमण काढण्याचे काम पोलीस बंदीबस्तामध्ये चालू आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच, उपसरपंच पाचवड ग्रामपंचायत तसेच गरमपंचयात सदस्य यांची चांगली मदत झाली आहे.

  या सदरच्या अतिक्रमण मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर गोरे , (शाखा अभियंता), भिलारकर ( ,स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक , महेश गायकवाड , महेश मेसी , हमजद पठाण , सुभाष सोनवणे आदी कर्मचारी सामील आहेत .

  अशाप्रकारे पुढील महिन्याभरात वाई सुरूर रस्ता , वाई महाबळेश्वर रस्ता , वाई ओझरडे रस्ता , वाई मांढरदेव रस्ता ,आणि इतर रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढुन टाकन्याची मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे असल्याचे श्रीपाद जाधव यांनी सांगितले.

  अतिक्रमणधारकानी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत अन्यथा अतिक्रमण केलेली मालमत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून घेऊन जप्त करण्यात येईल आणि पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल .तरी वाहतूक सुरळीत चालावी आणि अपघात होऊ नये म्हणून सर्वांनी अतिक्रमणे काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे.