किडनीच्या समस्यांपासून वाचायचे आहे?; मग हे अवश्य करा

किडनी निरोगी राहण्यासाठी रोज भरपूर पाणी प्या. कमी पाणी प्यायल्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे येतात. किडनी आणि मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. संसर्गामुळे विषारी पदार्थ शरीरात साठून राहतात.

  अलिकडच्या काळात या ना त्या कारणांनी किडनीच्या विकारांचे प्रमाण वाढताना पहायला मिळत आहे. ही गंभीर बाब असून या संदर्भात वेळीच उपाययोजना आवश्यक ठरतात. मुख्यत्वे रक्तदाब, शरीरातील सोडियम, पोटॅशियम आणि आम्लता यावर किडनीचं नियंत्रण असतं. म्हणजे किडनी निरोगी असेल तरच आपण निरोगी राहू शकू.

  किडनीला निरोगी कसं ठेवावं या वषयी..
  किडनी निरोगी राहण्यासाठी रोज भरपूर पाणी प्या. कमी पाणी प्यायल्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे येतात. किडनी आणि मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. संसर्गामुळे विषारी पदार्थ शरीरात साठून राहतात. म्हणून भरपूर पाणी प्या.
  ताजी फळं, फळांच्या रसाने किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडतात. फळांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं राहतं.
  हिरव्या पालेभाज्यात पोटॅशियम असतं. द्राक्ष, लिंबू, संत्र, केळं, किवी अशी फळं किडनीसाठी उपयुक्त असतात.

  ब्लूबेरी, ब्लॅकबेरी अशी फळं उपयुक्त असतात. यामध्ये क्विनाईन हा घटक असतो. याचं रूपांतर हिप्युरिक अँसिडमध्ये होतं. यामुळे युरिक अँसिड एका ठिकाणी साचून राहत नाही आणि किडनीचं अनेक रोगांपासून रक्षण होतं.