मुंबईत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाणी टंचाई; नगरसेवकांच्या तक्रारीवर BMC चे स्पष्टीकरण

मुंबईतील अनेक भागात कमी दाबाने होणा-या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. स्थायी समितीत यावर पडसाद उमटल्यानंतर पालिकेने महापालिकेने पाणी टंचाई असलेल्या भागात शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाणी टंचाई होत असल्याचे समोर आले. गळती दुरुस्त झाल्यानंतर त्या भागातील पाणी समस्या दूर झाली आहे. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्थायी समितीत दिली(Water scarcity in Mumbai due to leakage of waterways; BMC's explanation on corporator's complaint).

    मुंबई : मुंबईतील अनेक भागात कमी दाबाने होणा-या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. स्थायी समितीत यावर पडसाद उमटल्यानंतर पालिकेने महापालिकेने पाणी टंचाई असलेल्या भागात शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाणी टंचाई होत असल्याचे समोर आले. गळती दुरुस्त झाल्यानंतर त्या भागातील पाणी समस्या दूर झाली आहे. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्थायी समितीत दिली(Water scarcity in Mumbai due to leakage of waterways; BMC’s explanation on corporator’s complaint).

    यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले आहेत. त्यामुळे मुंबई पाणी पुरवठा करणा-य़ा जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र असे असतानाही ऐन दिवाळीत मुंबईतील विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. याचे स्थायी समितीतही तीव्र पडसाद उमटले. नगरसेवकांनी आपआपल्या विभागात पाणी समस्येचा पाढाच वाचला. प्रशासनाच्य़ा हलगर्जीपणाच्या निषेधार्थ स्थायी समितीची बैठकही तहकूब करण्यात आली.

    पाणी समस्येवर प्रशासनाने कोणत्या उपायोजना केल्या याबाबतची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच सेवा जलाशयांमध्येही पाण्याची पातळी योग्य आहे. मात्र जलाशय ते नागरिकांच्या घरापपर्यंत जाणाऱ्या मार्गात पाण्याची प्रमुख समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे, असे स्पष्ट केले.

    रवी राजा यांच्या प्रभागात अभियंता व कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. माटुंगा एफ-उत्तर व परळ एफ-दक्षिण विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जोडणाऱ्या ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर व वडाळा ट्रक टर्मिनल रोड येथे दुसरी गळती आढळून आली होती. तसेच तिसरी गळती जे. के.भसीन मार्गावर मुख्य जलवाहिनीवर आढळून आली आहे.

    तसेच किंग्ज सर्कल प्रभागात महानगर गॅस जंक्शनला १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडणाऱ्या ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती आढळून आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक लहान तक्रारींकडे लक्ष देवून लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांचे फोन उचलून त्यांना प्रतिसाद द्या, अशा सूचना अधिकारी, कर्मचा-यांना दिल्याचे वेलारासू यांनी सांगितले. मुंबईतील दोन प्रभागांमध्ये दहा ते बारा ठिकाणी गळती आढळून आली आहे. अजूनही जलाशयांमधील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात नसल्याने कधी कमी तर कधी जास्त दाबाने पाण्याचा पुरवठा होतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.