पुण्यातील ‘या’ भागात शुक्रवारी पाणी नाही !

लष्कर आणि बंडगार्डन पाणी पुरवठा केंद्राच्या मुख्य जलवाहिन्यांचे काम शुक्रवारी (ता. १२) केले जाणार आहे. यामुळे या केंद्रातून हाेणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर पाणीपुरवठा, बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जल वाहिन्यांवरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने लष्कर पंपिग येथील उपरोक्त पंपिगचे अखत्यारितील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

    पुणे : लष्कर आणि बंडगार्डन पाणी पुरवठा (Water Supply) केंद्राच्या मुख्य जलवाहिन्यांचे काम शुक्रवारी (ता. १२) केले जाणार आहे. यामुळे या केंद्रातून हाेणारा पाणी पुरवठा बंद (Water Supply Discontinued) राहणार आहे.

    लष्कर पाणीपुरवठा, बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जल वाहिन्यांवरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने लष्कर पंपिग येथील उपरोक्त पंपिगचे अखत्यारितील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या केंद्रातून हाेणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहील आणि शनिवारी या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल.

    पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

    बंडगार्डन जलकेंद्र भाग : संपूर्ण खराडी, वडगाव शेरीमधील गणेश नगर, आनंदपार्क, माळवाडी, मुक्ताईनगर.

    लष्कर जलकेंद्र भाग : संपूर्ण केशवनगर, मुंढवा व इतर परिसर.