
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी (Kolhapur District Central Bank Election) शिरोळ सेवा संस्था गटातून दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे बिनविरोध होतील. जिल्हा नेतृत्वाने या एकजुटीला कमी समजले व कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यास शिरोळ तालुक्याची ताकद जिल्ह्याला दाखवून देऊ असा गर्भित इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी (Kolhapur District Central Bank Election) शिरोळ सेवा संस्था गटातून दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे बिनविरोध होतील. जिल्हा नेतृत्वाने या एकजुटीला कमी समजले व कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यास शिरोळ तालुक्याची ताकद जिल्ह्याला दाखवून देऊ असा गर्भित इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला. ते गणपतराव पाटील यांच्या अर्ज भरण्यापूर्वी घेतलेल्या ठरावधारकांच्या कार्यक्रमात बोलत होते.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी शिरोळ तालुका सोसायटी गटातून अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर तमदलगे (ता. शिरोळ) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीवर कार्यकर्त्यांचा व ठरावधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात ठरावधारक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, दिलीपराव पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, डॉ. संजय पाटील, अशोकराव माने, धनाजीराव जगदाळे, चंगेजखान पठाण, अनिलराव यादव,जालंदर पाटील, विजय भोजे, महादेवराव धनवडे यांच्यासह ठरावधारक, पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.