मकर साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ;

    मकर (Capricorn) :

    एकूण ग्रहमान पाहता बहुतांश कार्यक्षेत्रात आपण यशाची वाटचाल कराल, उद्दिष्ट साध्य कराल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला विशेषतः नाट्य, संगीत क्षेत्रातील कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. प्रवासाचे योग येतील. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. आर्थिक व्यवहारात तज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्या. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. वादाचे प्रसंग टाळा. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा, त्यांना संधी देऊ नका. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.