धनु साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; कोर्टकचेरीच्या कामात यश संभवते

    धनु (Sagittarius) :

    आपले ग्रहमान पाहता प्रत्येक कार्यात प्रयत्नशील राहिल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करता येणे शक्य आहे. स्थावर-जंगमबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात यश संभवते. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकते. घरगुती वातावरण ठीक राहील. प्रवासात सावध राहा. आकस्मिक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, विशेषतः उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.