कुंभ साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; कामानिमित्त अचानक प्रवास संभवतात

    कुंभ (Aquarius) :

    आपले ग्रहमान पाहता सकारात्मक विचाराने सर्व बाबतीत वागण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होऊ शकतात. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा प्रथमपासून अनावश्यक खर्च टाळा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावे. कामानिमित्त अचानक प्रवास संभवतात. नको त्या प्रलोभनात अडकू नका. जोडीदाराला खूश ठेवा. जीवनाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करा. स्थावरबाबतचे प्रश्न सोडवू शकाल. प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, अपचनापासून सावध राहा. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्या.