सिंह साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; आपण घेतलेल्या श्रमांना योग्य तऱ्हेने न्याय दिला जाईल

    सिंह (Leo) :

    एकूण ग्रहमान पाहता आपल्याला कार्यालयीन कामकाजात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळणार आहे. आपण घेतलेल्या श्रमांना योग्य तऱ्हेने न्याय दिला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक बाजू सुधारेल. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा, त्यांना संधी देऊ नका. प्रवासाचे य़ोग येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. मित्रमंडळींच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराशी सामंजस्याने वागा.