मीन साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व्यावहारिक उलाढालीत यश मिळू शकेल

    मीन (Pisces) :

    एकूण ग्रहमान पाहता आपल्या कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल आणि बरीचशी कामे हातावेगळी कराल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळेल. उद्योग-व्यवसायात वाढ होईल. प्रवास योग येतील. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व्यावहारिक उलाढालीत यश मिळू शकेल. अनावश्यक खर्च टाळा. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.